0
202

घुग्घुस येथे माता रमाई यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी

घुग्घुस : दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता, घुग्घुस येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात माता रमाई आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या कार्यास उजाळा दिला.

या कार्यक्रमाला भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष श्री. संजय तिवारी, रामपाल वर्मा, संजय भोंगळे, प्रेमलाल पारधी, राजेंद्र लुटे, महेंद्र बाग, स्वप्नील वाढई, मुन्ना लोडे, चिन्नाजी नलबोगा, गणेश शेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या त्याग, समर्पण व संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शांततामय व उत्साही वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!