Home चंद्रपूर वरुर येथे अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

वरुर येथे अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0
193

वरुर येथे अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

 

वरुर रोड/राजुरा, ७ फेब्रू. :- आज दुपारच्या सुमारास वरुर येथील इंदिरा विद्यालयाच्या मागील परिसरात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मृतावस्थेत अनोळखी प्रौढ इसम आढळून आला.

या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांची गर्दी जमली. स्थानिक पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असून अनोळखी व्यक्तीचे नाव बंडू धोटेकर असून जवाहर नगर राजुरा येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर इसम ५० ते ५५ वयोगटातील असून ही आत्महत्या आहे की, हत्या हे पोलीस प्रशासनाच्या तपासा अंती समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!