Home गडचिरोली माओवादी पोलीस चकमकीत तीन नक्षलवादी तर एक जवान शहीद

माओवादी पोलीस चकमकीत तीन नक्षलवादी तर एक जवान शहीद

0
133

माओवादी पोलीस चकमकीत तीन नक्षलवादी तर एक जवान शहीद

गडचिरोली, सुखसागर झाडे

 

महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील फोदेवाडा जंगल परीसरात गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष नक्षलविरोधी अभियान पथकाने राबविलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत पोलिस – नक्षल चकमक उडाली यात दिपक चीन्ना मडावी या C60 जवानाला वीरमरण आले तर तीन नक्षलवादी ठार झाले. एक जवान जखमी असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत असताना चकमकीत पोलिस जवानाला आपला जीव गमवावा लागला ही घटना अतिशय दुःखद आहे. अबुझमाड येथील अभियानादरम्यान विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८) सध्या रा. अहेरी | मूळ रा. मांड्रा, दामरांचा, ता. अहेरी हे जखमी झाले होते.

आज पहाटे अबुजमाड येथील घनदाट जंगलातून त्यांना हेलिकॉप्टरद्वारे उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे आणण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने अभियानादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्यांना देशसेवेत वीरमरण आले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या शूर वीराला
गडचिरोली पोलीस दलाचा मानाचा सलाम.
गडचिरोली पोलीस दल शहिद पोलिस जवान दिपक चिन्ना मडावी, यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!