Home गडचिरोली गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई ; बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई ; बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश

0
129

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई ; बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश

 

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :- गडचिरोली पो.स्टे. व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने केलेल्या संयुक्त कारवाईत बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

 

४ आरोपीना अटक करण्यात आली असून हायटेक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर व इतर साहित्य असा एकूण 39 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

बँकेत जमा झालेल्या बनावट नोटांमुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.गडचिरोली पोलीसांच्या तत्पर तपासकामी कार्यवाही व तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपींना अटक करण्यात मोठे यश आले.

 

जनतेने सतर्क राहून संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!