ती देशी दारूभट्टी शहरात नकोच? नगरपरिषदेत बहुमताने ठराव पारित
घुग्घूस :- शहरातील प्रभाग क्रं 03 येथे मुख्य मार्गांवर बस स्थानका समोर मंदिर परिसराच्या जवळच नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच देशी दारू भट्टीचे नवीन दुकान उघडण्यात आलेले आहे.
या देशी दारू भट्टीला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे.
या भट्टीमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही अग्रवाल यांची ही देशी दारू भट्टी शहरात नकोच ही भूमिका घेत नगरपरिषद घुग्घूसच्या वतीने नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उपाध्यक्ष राजुरेड्डी व सर्व सभापती नगरसेवकांच्या संमतीने शहरातील देशी दारुभट्टीचे दुकान बंद करण्यात यावी असा ठराव पारित करण्यात आला.





