Home गडचिरोली चामोर्शी पोलिसांनी उल्लेखनीय कर्तव्य बजावीत 2 लक्ष 39 हजार रुपये किमतीचे 11...

चामोर्शी पोलिसांनी उल्लेखनीय कर्तव्य बजावीत 2 लक्ष 39 हजार रुपये किमतीचे 11 मोबाईल केले हस्तगत

0
98

चामोर्शी पोलिसांनी उल्लेखनीय कर्तव्य बजावीत 2 लक्ष 39 हजार रुपये किमतीचे 11 मोबाईल केले हस्तगत

पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार यांच्या शुभहस्ते तक्रारदारांकडे सुपूर्द…

चामोर्शी, सुखसागर झाडे :- पोलीस स्टेशन हद्दीतील मागील काही कालावधीमध्ये चामोर्शी परिसरातून गहाळ व चोरी झालेले 11 अँड्रॉइड मोबाईल प्रकरणे CEIR पोर्टलच्या सहाय्याने व तांत्रिक कौशल्याचा वापर करून चामोर्शी पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वार्षिक निरीक्षणासाठी आलेले गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. यावेळी गडचिरोली पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे उपस्थित होते.
ही उल्लेखनीय कामगिरी चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अंमलदार मनीषा चिताडे व पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!