लाॅयड्स मेटल्स उद्योग अग्निशमाने शेणगाव शेतातील आग विझवण्यात यश

घुग्घुस येथुन दि.२१ मे २०२६ गुरुवार रोजी दुपार ११ वाजता अंदाजे ४ किलोमीटरवर असणारे ग्रामीण भागातील शेणगाव येथील श्मशान भुमी परिसरातील शांताराम बावणे यांच्या शेतात आग लागली होती अशी माहिती एका कामगार कर्मचार्याकडून लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी प्रा.लिमिटेड कंपनीतील सेफ्टी ऑफिसर अक्षय थेटे यांना माहिती मिळताच लगेच अग्निशमन व फायर फोन करण्यात आले.
घटनेचे ठिकाण :- शमशान भूमी बावणे मळ्याजवळ शेणगाव
अग्नीचा प्रकार – घन आग
मालमत्ता गुंतलेली – केबल – मोटर
अग्निशामक उपकरणे वापरली*- FT मध्ये 3000 लीटर पाणी वापर
कार्यसंघ अग्निशमन केंद्रावर परतणे – दुपारी 1.20 वा
पर्सन रिपोर्टिंग – अक्षय सर
मासेज मिळाले – डीसीपीओ शुभम दरेकर
आगीचे वर्णन – टीमला अक्षय सरांचा फोन आला शेनगाव बावणे शेतात आग, टीम घटनास्थळी पोहोचली आम्ही अग्निशमन दलाच्या 3000 लीटर पाण्याचा वापर करून आग विझवण्यात आले.
लाॅयड्स मेटल्स कंपनीच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेतातील मोठे नुकसान टळले. शेतात आग लागल्याची माहिती मिळताच जवळच्या लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.आगीवर नियंत्रण: पाण्याच्या आणि फोमच्या माऱ्याने जवानांनी धगधगती आग वेळेत विझवली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले: आग आजूबाजूच्या इतर शेतांमध्ये किंवा पिकांमध्ये पसरण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.








