Home चंद्रपूर लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, घुग्घुस मार्फत विधवा महिलांच्या उदरनिर्वाहासाठी शेळी पालन युनिट वाटप

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, घुग्घुस मार्फत विधवा महिलांच्या उदरनिर्वाहासाठी शेळी पालन युनिट वाटप

0
151

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, घुग्घुस मार्फत विधवा महिलांच्या उदरनिर्वाहासाठी शेळी पालन युनिट वाटप

सामाजिक दायित्वातून स्वावलंबनाचा नवा मार्ग ; विधवा महिलांना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी

 

घुग्घुस :- ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन यांच्या वतीने घुग्घुस परिसरातील विविध गावांमध्ये विधवा महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत विधवा महिलांना स्वरोजगार व स्वावलंबन मिळावे या दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसायासाठी शेळी युनिट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत पांढरकवडा, वढा,शेणगाव व म्हातारदेवी या घुग्घुस परिसराच्या गावांतील एकूण ९ विधवा महिलांची निवड करून त्यांना प्रत्येकी एक शेळी युनिट प्रदान करण्यात आले. प्रत्येक शेळी युनिटमध्ये १ बोकड व ४ गाभण बकर्‍या देण्यात आल्या असून, या माध्यमातून महिलांना दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्याचा लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन चा प्रयत्न आहे. तसेच या मार्फत महिलांना शेळी पालन प्रशिक्षण देण्यात आले या माध्यमातून शेळी पालन कश्या प्रकारे करण्यात येते या संबंधित प्रशिक्षण साफल्य महिला बचत गटामार्फत उपरवाही येथे देण्यात आले. या मध्ये शेळी संगोपन व आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण व रोग प्रतिबंधक उपाय, चारा व्यवस्थापन, स्वच्छता व गोठा व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती व विक्री पद्धती या बद्दल महिलांना प्रशिक्षित करण्यात आले. शेळी पालन हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो तसेच ग्रामीण भागासाठी अनुकूल आहे, अल्प कालावधीत उत्पन्न देणारा आहे व पशुधन वाढीमुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारा आहे या सर्व बाबींचा विचार करून हा उपक्रम आखण्यात आला. यामुळे काही महिन्यांतच पिल्लांची संख्या वाढून महिलांना शेळ्या विक्रीतून थेट उत्पन्न भविष्यातील शेळी युनिट विस्ताराची संधी, नियमित आर्थिक चक्र निर्माण करण्याची क्षमता प्राप्त होणारा आहे.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक सक्षमीकरणाचा एक ठोस प्रयत्न आहे. विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना आत्मविश्वास देणे आणि त्यांचा निर्णयक्षमतेवर विश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढतो, कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात त्यांचा सहभाग वाढतो, समाजात त्यांचा मान-सन्मान वाढतो, पुढील पिढीसाठी सकारात्मक उदाहरण निर्माण होते.
या उपक्रमामुळे लाभार्थी विधवा महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल, त्यांना स्थिर उत्पन्न मिळेल आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे स्वागत होत असून, हा कार्यक्रम इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!