लक्षवेधी
घुग्घुस येथील धूळ प्रदुषण नियंत्रणमुक्त होणार का!
नवनियुक्त काही नगरसेवक जोमात अन्य नागरिक कोमात…
घुग्घुस शहर व परिसरातील नागरिकांकडून बोलण्यात येत आहे नवनियुक्त काही नगरसेवक बनले महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल काम बनता भाड मै जाए जनता राजकारण असच चालत राहणार का!
काही नगरसेवक एकाच प्रभागातील अलग- अलग निवडणूकीत लडले आणि निवडणूनही आले आणि फक्त खुर्ची साठी झगडे चालु झाले होते नागरिकांकडून अनेकानेक चर्चा चाय टपरीवरच करण्यात येत आहे.
कुणी नगरसेवक पोस्टर्स लावण्यात मस्त तर कुणी हळद कुंकु व सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आणि बोलण्यात येते आम्ही विकास केला तर कुणी म्हणते आता आम्ही विकास करू नागरिक जागरूक होणारच आणि या नगरसेवकांना धडा शिकवणार का असेही बोलण्यात येत आहे.
*चाय टपरीवर सर्वाधिक नागरिकांकडून बोलण्यात येत आहे धूळ प्रदुषण नियंत्रणमुक्त होणार का!*
घुग्घुस परिसरात धूळ प्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे, आरोग्यावर तिचा चांगलाच परिणाम नागरिकांच्या पर्यावरणावर व दैनंदिन जीवनावर होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक अनेक विद्यार्थांनावर वैज्ञानिक विचार करून स्थानीय पातळीवर अमलात आणता येणार असे व्यवहार सर्व नगरसेवक एक येवुन राजकारण बाजूला ठेवुन एक होवुन धूळ प्रदुषण रोखण्यासाठी उपाय योजना केल्या पाहिजे घुग्घुस शहर एक प्रदुषण नियंत्रणमुक्त झाले पाहिजे असे संभव होणार सर्व नगरसेवक एकत्र येऊन कामे करा.
नाहीतर काही दिवसानंतर पाणी द्या घरोघरी लावणार ते काही कामाच नाही पहिले प्रदुषण मुक्त करा नाली वर झाकणे लावा जडवाहतूक प्रभाग क्रमांक ३ मधुन जातात का जातात प्रदुषण वाढते अपघात होणार यांच्याकडे पाणी पुरवठा नगरसेवकांनी काळजीघेवून लक्ष वेधून निर्णय घेण्यात यावा तेथील नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.
काही प्रभागात कुपन ,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा परिसरातील कंपनीकडून कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यात यावे,प्रदूषणमुक्त यंत्रणा लावल्या पाहिजे, कंपनीद्वारे शहराले दत्तक घेतले पाहिजे असे विरोधी नगरसेवक निर्णय घेणार का!तरी राज्यात व केंद्रात सत्ता त्यांचीच आहे पण आम्ही सत्ता नाही आहे शहरात हेच म्हणुन टाळणार आणि नागरिकांना कुपन देवुन,पोस्टर-बैनर लावुन खुश करित राहणार का ! असेही चर्चा होत आहे.
घुग्घुस परिसरातील विविध कंपनीतून नागरिकांना त्रास सहन करत असलेल्या नांगरिकांना सर्व नगरसेवक एकत्रित येऊन प्रदुषण नियंत्रणमुक्तांची संघटनात्मक चर्चा करून थोर निर्णय घेणार का!
*नगरसेवकांनी लक्ष वेधा👇*
प्रदूषण ही आधुनिक काळातील एक गंभीर जागतिक समस्या असून, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यांमुळे हवा, जल आणि मृदा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे ,यामुळे मानवजात आणि नैसर्गिक परिसंस्थेवर भयानक परिणाम होत आहेत. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक लादणे गरजेचे आहे
प्रदूषण: समस्या व उपाय (निबंध)
प्रस्तावना:
आजच्या आधुनिक आणि प्रगत युगात प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. विकास साधताना माणसाने निसर्गाचा अतिरेकी वापर केला, ज्याचे परिणाम म्हणून आज हवा, पाणी, जमीन आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे अनेक प्रकारचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती ओढवत आहेत
प्रदूषणाचे मुख्य प्रकार व कारणे:
*वायुप्रदूषण:* कारखान्यांमधून निघणारा धूर, वाहनांचा धूर आणि जंगलतोड यामुळे हवेत विषारी वायू मिसळत आहेत
*जलप्रदूषण:* कारखान्यांतील रासायनिक कचरा आणि शहरातील सांडपाणी नद्या व समुद्रात सोडल्यामुळे जलप्रदूषण होत आहे
*मृदा/जमीन प्रदूषण:* शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे
*ध्वनी प्रदूषण:* वाहनांचा प्रचंड आवाज, लाऊडस्पीकर आणि फटाक्यांमुळे हे प्रदूषण वाढले आहे
*प्रदूषणाचे परिणाम:*
प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत, जसे की दमा, कर्करोग आणि त्वचेचे विकार. याशिवाय ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमानवाढ), प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणे आणि हवामान बदल यांसारख्या समस्या उद्भवत आहेत
*प्रदूषणावर उपाय:*
वृक्षारोपण: जास्तीत जास्त झाडे लावणे आणि जंगलांचे संरक्षण करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे
*प्लास्टिक बंदी:* प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावा
*पर्यायी ऊर्जा स्त्रोत:* सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या प्रदूषणमुक्त ऊर्जा साधनांचा वापर वाढवावा
*जागरूकता:* सामान्य नागरिकांमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे.
*कायदा अंमलबजावणी:* कारखान्यांमधून निघणाऱ्या विषारी कचऱ्यावर कडक कायदेशीर निर्बंध असावेत
*निष्कर्ष:*
प्रदूषणमुक्त पर्यावरण ही काळाची गरज आहे. “पर्यावरण रक्षण, हीच काळाची गरज” हे ओळखून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. भावी पिढीला स्वच्छ आणि सुंदर जग देण्यासाठी आजच प्रदूषणाविरुद्ध लढणे आवश्यक आहे.
नगरसेवकांनी अनेक पक्ष व अपक्ष एकत्रित येवुन काळजीघेवून लक्ष वेधून निर्णय घेण्यात यावे,घुग्घुस शहरातील धूर प्रदूषण मुक्त करावे.








