Home चंद्रपूर स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांना आदरांजली…

स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांना आदरांजली…

0
173

स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांना आदरांजली…

 

 

घुग्घूस :- दिनांक १० ऑक्टोबर २०२५

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालीत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घूस ता. जि. चंद्रपूर येथे संस्थेचे संस्थापक स्व. प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांना रक्तदानासह विविध कार्यक्रम राबवून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी आयोजित आदरांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या अनू चोथे तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक राजूभाऊ रेडड़ी,तिवारी,पाझारे,गोहणे, कामगार नेते सय्यद अन्वर, महेश लढा, अनिल बाम, रमन तांड्रा, दिपक कांबळे, पृथ्वीराज आगदारी, ऋषी कोवे, आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व. प्राचार्य रमेशचंद्र यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आठवडयात विदयार्थीनींची आरोग्य तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप, निबंध स्पर्धा,वृक्षारोपन, पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर आरोग्य व रक्तदान शिबीरासाठी डॉ.पडगीलवार, एन. पी. शेडमाके जिल्हा आरोग्य विभाग व प्राथमिक स्वास्थ्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. स्वच्छता व आरोग्य शिबीराचे आयोजन करुन त्यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी तर आभार कु.वैभवी डंभारे होने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थीनीं अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!