Home चंद्रपूर लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
228

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्ताचा एक थेंब अनेक जीव वाचवु शकतो – वाय.जी.एस. प्रसाद

सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेच्या भावनेतून लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या वतीने चंद्रपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा सुनिश्चित करणे आणि “एक थेंब रक्त – अनेकांचे जीवन” या मानवतावादी संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविणे हा होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड श्री. वाय.जी.एस प्रसाद यांच्या हस्ते, प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.प्रशांत पुरी, श्री. पवन मेश्राम, श्री.गुणाकर शर्मा, विद्या पाल (BTO), डॉ.स्वाती तसेच शासकीय रुग्णालयाची वैद्यकीय टीम उपस्थित होती. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरादरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रक्तदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पार पडली. अनेक युवक-युवतींनी तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. संस्थेच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, हेल्मेट आणि टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना श्री. वाय.जी.एस प्रसाद म्हणाले, “रक्तदान ही सर्वोच्च मानवसेवा आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. रक्ताचा एक थेंब अनेक जीव वाचवू शकतो, म्हणून प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा रक्तदान करण्याची सवय लावली पाहिजे.”

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी आणि सहकाऱ्यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. शिबिराच्या अखेरीस सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या रक्तदान शिबिरात एकूण ३५० नागरिकांनी रक्तदान करून समाजासाठी आपले मोलाचे योगदान दिले. हा उपक्रम लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या समाजसेवेतील आणखी एक प्रेरणादायी पाऊल ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!