जवाहर नवोदय विद्यालयाच्या इमारतीला लागली उतरती कळा
इमारतीच्या जिर्णावस्थेमुळे विधार्थी वर्गाच्या जिवाला धोका
चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात घोट येथे एकमेव असे हे नावलौकिक जवाहर नवोदय विधालय आहे.
नवोदय विधालयात प्रवेश मिळावा म्हणून वर्ग ५ मध्ये शिकत असलेल्या इतरत्र शाळेत शिक्षण घेणारे विधार्थी हे जिवाचे राण करून विधेचे उद्यान फुलवण्यासाठी अहोरात्र मोठ्या चिकाटीने विधार्थीगण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात व उच्च गुणानुक्रमे विधार्थ्यांची निवड झालेल्यांनाच प्रवेश
दिला जातो. जवाहर नवोदय विधालयात शिक्षणाचा दर्जा एवढा भारी असतो की, बहुतांश विधार्थी हे जिवनात मोठमोठ्या पदाला गवसणी घालत असतात. शैक्षणिक जिवणात उचांक भरारी घेत असतात,विश्वासाहार्त हमखास यशस्वी होत असतात हा नवोदय विधालयाचा तेथील उच्च विद्याविभूषित अध्यापकांचा पराक्रमी विक्रम अनेक दशकापासून कायम दिसून येतो आहे.
त्यामुळे नवोदय विधालयात शैक्षणीक प्रवेश मिळावा हे प्रत्येक पालकांचे व विधार्थ्यांचे दिव्यस्वप्न असते.
परंतु मागील अनेक वर्षांपासून निर्माण झालेला यशोगाथीत शैक्षणिक पिंजरा ( 🏢इमारत) मात्र मोडकळीस आलेला आहे. सदर विधालयाची जुनी इमारत हि कधी आणि केव्हा कोलमडून पडेल याची शाश्वती नाही. सदर बाबीमुळे विधार्थी व शिक्षक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बाबींचा विचार करून माजी विधालयाचे प्राचार्य राजन सर यांनी तसा अहवाल अंदाजे १३ करोड चा इस्टिमेट तयार करून शासन स्तरावर पाठविला होता.
शासन स्तरावरून फक्त ३ करोड रुपये मंजूर झाले असून आता या बजेट मध्ये वरील नवीन इमारत बांधकाम तयार करने शक्य नाही. विधार्थी अत्यावश्यक सोयी सुविधा चा अभाव पुर्ण करण्यासाठी मॉड्युलर प्रसाधन गृहाची निर्मिती करण्याची तयारी येत्या दोन दिवसात सुरु करू असे मत तत्कालीन प्राचार्य ममता लांजेवार यांनी व्यक्त केले आहे. सदर गंभीर बाब सांसद महोदय यांचे स्वत व उप प्राचार्य यांना सोबतीने प्रत्यक्ष मांडणार असल्याचे ते बोलत होते.








