धानोरा येथील नागरिकांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव…
३०/०१/२०१९ ला गट विकास अधिकारी यांच्या पत्रावर सुद्धा काहीच कार्यवाही नाही
येत्या १० दिवसात रस्त्या संदर्भात कार्यवाही न झाल्यास उपोषणास बसू असा कु. पल्लवी गौरकार हिने दिला इशारा
चंद्रपूर :- तालुक्यातील धानोरा येथे गेल्या अनेक वर्ष्या पासून आम्ही राहीवासी असून आमच्या घराकडे ये-जा करण्यासाठी साठी कुठलाही योग्य मार्ग नसून नागरिक घरा पासून काही अंतरवार बैलबंडी मोटर सायकल ठेऊन पायदळ ये-जा करतात. या संदर्भात गट विकास अधिकारी साहेब यांना २९/१/२०१९ ला निवेदन दिले होते. गट विकास अधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायत ला दिनांक ३०/१/२०१९ ला पत्र आले. तरी सुद्धा ग्रामपंचायतने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा आरोप अर्जदारांनी केला.
तसेच कु. पल्लवी गौरकार हिच्या नेतृत्वाखाली १२/०८/२०२५ ला ग्रामपंचायत कार्यलय धानोरा येथे निवेदन दिले. जवळ पास एक महिना होऊन सुद्धा ग्रामपंचायत मार्फत कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्या मुळे आज दिनांक १०/९/२०२५ ला मा. श्री. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, गट विकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर, मा. आमदार साहेब चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, मा. उपविभागीय अधिकारी साहेब चंद्रपूर, मा. तहसीलदार साहेब चंद्रपूर, मा. जिल्हा अधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. आणि येत्या १० दिवसात सदर निवेदना वर कोणतेही कार्यवाही न झाल्यास समस्त नागरिकांना घेऊन ग्रामपंचायत कार्यलया समोर उपोषणास बसणार असा थेट इशारा कु. पल्लवी भिकाजी गौरकार हिने दिला आहे.








