रिपब्लिकन सेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न…
चंद्रपूर :- रिपब्लिकन सेना च्या वतीने कार्यकर्त्यांची आढावा बैठक दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे घेण्यात आली. रिपब्लिकन सेनेच्या आढावा बैठकी करिता मुंबई वरून रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव प्रा. श्रीपती ढोले यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. ढोले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी मिळून युती करीत शिवसेना व रिपब्लिकन सेना हे दोन्ही पक्ष पुढील निवडणुका एकत्रितपणे लढण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांना पुढील होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता जोमाने तयारीला लागण्याचे आव्हान केले.
तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेने द्वारा मोठ्या प्रमाणात उमेदवार म्हणून युवकांना संधी देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी कार्यकर्ते सिद्धार्थ शेंडे, मयूर साखरकर, राजेश घुटके, राकेश निमसरकार, प्रतीक वाघमारे, सूरज खंडागळे, आशिष चव्हाण, कौशल पेटकर, मगदूम शेख, प्रफुल मेश्राम, रुपम देशकर तसेच रिपब्लिकन सेना महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा ज्योतीताई पाटील, सुनीता पेटकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.







