Home गडचिरोली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत चामोर्शी येथे तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत चामोर्शी येथे तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न

0
161

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत चामोर्शी येथे तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न

 

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान कार्यशाळेचे आयोजन आज दि. १२/०९/२०२५ ला चामोर्शी येथील सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेला संबोधित करताना एल. बी. जुवारे गट विकास अधिकारी, पंचायत समिती चामोर्शी यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना संदर्भात सविस्तर विस्तृत सखोल माहिती कार्यशाळेत उपस्थित पंचायत समिती अंतर्गत विविध विभागीय अधिकारी, कर्मचारी तथा सर्व ग्रामपंचायत सरपंच/ उपसरपंच सदस्य गण, गाव पातळी स्तरावरील उपस्थित कर्मचारी यांना दिली.
आपल्या मार्गदर्शनातुन मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना बाबत माहिती देत हे अभियान यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रतेकांनी आपआपले कर्तव्य बजावावे व प्रत्येक गावपातळीवरील नागरिकांपर्यंत पोहचवावी व योजनांची सुयोग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे
प्रशांत घोरुडे तहसीलदार चामोर्शी यांनी महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना बाबत उहापोह करीत जनसामान्यांना योजनांचा कसा फायदा घेता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन करीत,महसूल पंधरवाडा अंतर्गत नागरिकांना शक्यतोवर जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, मोनिका राऊत पुरवठा निरिक्षक यांनी आपल्या विभागा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यशाळेला संबोधित केले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती चामोर्शी चे अधिकारी व कर्मचारी यानी योगदान दिले. सर्व कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती च्या कल्पना म्हशाखेत्री तालुका व्यवस्थापक यांनी कार्यशाळेची धुरा सांभाळली.
सदर कार्यशाळेला पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!