Home चंद्रपूर चिमूर आगाराची एस. टी. बस नाल्यात झाली पलटी

चिमूर आगाराची एस. टी. बस नाल्यात झाली पलटी

0
485

चिमूर आगाराची एस. टी. बस नाल्यात झाली पलटी

चारगाव येथील घटना, एक ठार : ३५ हून अधिक जखमी

तालुका प्रतिनिधी
चिमूर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची चिमूर आगारातील चिमूर – चंद्रपूर ही बस चारगाव जवळील नाल्यात चालकाचे वाहनावरील नियत्रन सुटल्याने नाल्यात उलटली.यात ३५ प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की,चिमूर आगारातील चिमूर वरून चंद्रपूर कडे जाणारी एम.एच.४० क्यू.६१८१ ही बस चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्गवरील चारगाव परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमारे दहा फूट खोल नाल्यात उलटली. या बस चालक चे सुनील पुसणाके ,वाहक सुरेश भटालकर याचे सह ३५ प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बस पलटल्याने आजू बाजूच्या शेतात काम करण्याऱ्या मजुरांनी घटना स्थळी धाव घेतली व शेगाव पोलिसांना माहिती कळवली.बस चालकास मिरगी येत असल्याची चर्चा नागरिकात सुरू होती.

अपघाताच्या नंतर लगेच मदतकार्य सुरू करण्यात आले.पोलीस प्रशासन व महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले,नागरिकांच्या मदतीने जखमी ना खासगी वाहनाने वैद्यकीय मदतीकरिता रवाना करण्यात आले तर अनेकांना चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले . यात उपचारासाठी नेत असताना एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वृत्त लीहिस्तोवर मृतक व जखमी प्रवाशांची नावे कळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!