Home चंद्रपूर सहकारी पतसंस्था कडून सहकार सप्ताह आयोजित

सहकारी पतसंस्था कडून सहकार सप्ताह आयोजित

0
156

सहकारी पतसंस्था कडून सहकार सप्ताह आयोजित

 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 साजरे करण्यासाठी दिनांक 30 जून ते 6 जुलै 2025 या कालावधीत सहकार सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यात मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ,वणी आणि तालुक्यातील सर्व सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष /उपाध्यक्ष/संचालक, व्यवस्थापक , कर्मचारी, एजंट, सभासद सर्व पदाधिकारी यांचे सहभागाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सहकार प्रशिक्षण, स्वच्छता अभियान, सहकार दिंडी, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
वणी येथे 2 जुलै रोजी सहकार कायदा कलम 101 अंतर्गत ऑनलाईन दावा दाखल करण्या बाबत पतसंस्थाना प्रशिक्षण देण्यात आले.
दिनांक 3 जुलै रोजी सकाळी गांधी चौक, आंबेडकर चौक , टिळक चौक या मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने हे अभियान यशस्वी झाले आहे.
दिनांक ०४/०७/२०२५ रोजी सकाळी ९- ०० वाजता आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्य सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय मैदानावर मोटरसायकल रॅली सकाळी 9 वा. आयोजित केली. या सहकार दिंडी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिंडी नंतर लगेच विजया गार्डन, वसंत गंगा विहार, वणी येथे वृक्षारोपण आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 5 जुलै रोजी शुक्रवार ला सकाळी 11 वा. रंगनाथ चेंबर, साने गुरुजी चौक, वणी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
सदर सहकार दिंडी, वृक्षारोपण व रक्तदान शिबीर मध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन सहकार सप्ताह यशस्वी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करावा असे आवाहन आयोजक – श्री सचिनकुमार, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था , श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था म. वणी, केशव नागरी सहकारी पतसंस्था आणि सर्व सहकारी संस्था ,वणी तालुका यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!