माजी विद्यार्थ्यांकडून संस्थापक मा. संम्बामुर्ती यांच्या ७७ वा वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
घुग्घुस येथील अंदाजे ३ किलोमीटर अंतरावर नकोडा येथील तेलुगु शाळेतील माजी मुख्याध्यापक श्री.संम्बामूर्ती सर यांच्या ७७ वा वाढदिवस माजी विद्यार्थांनी आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांनी माजी मुख्याध्यापक श्री.संम्बामूर्ती सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.तसेच समोर वाटचालीस अभिनंदन करण्यात आले.
घुग्घुसच्या वृद्धा आश्रम येथे त्यांच्या केक कापण्यात आले.तसेच वृदा आश्रमात फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री.सैय्यद सलीम सरकार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष (अजित पवार गट) श्रीनिवास गोसकुला, मुन्नुरुकापू समाज जिल्हा महासचिव शंकर सिद्धम, मरियम्मा बहुउद्देशीय संस्था चिंतल्ला चन्द्रय्या, रवि चिट्टाला व माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.








