Home चंद्रपूर गावातून वृक्षदिंडी काढुन केले वृक्षारोपण

गावातून वृक्षदिंडी काढुन केले वृक्षारोपण

0
210

गावातून वृक्षदिंडी काढुन केले वृक्षारोपण

 

चिमूर – चिमूर पंचायत समिती अंतर्गत शेवटच्या टोकावर असलेल्या पिपर्डा ग्रामपंचायत च्या वतीने माझी वसुंधरा मोहिमे अंतर्गत आज सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मुलासह बँड ताशाच्या आवाजात वाजत गाजत गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली.

शाळेच्या व ग्रामपंचायत आवारात चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले. शाळेच्या परिसरात विविध प्रजातीच्या झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले. त्या वेळी, गटविकास अधिकारी नितीन फुलझेले, विस्तार अधिकारी गणवीर, सरपंच, आकाश भेंडारे, गजेंद्र राऊत, काकडे, ग्रामपंचायत अधिकारी अरविंद आदे, मुख्याध्यापक दोहतरे, शाळेतील शिक्षक, धनराज गजभिये, प्रमोद बोरकर, प्रमोद मेश्राम, प्रीतम तागडे, धर्मा आदे, दिवाकर मेश्राम, पत्रू सहारे, अतुल मेश्राम, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट प्रतिनिधी आदी जण उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!