Home चंद्रपूर नॅशनल कराटे स्पर्धेत घुग्घूसचे विद्यार्थी चमकले

नॅशनल कराटे स्पर्धेत घुग्घूसचे विद्यार्थी चमकले

0
579

नॅशनल कराटे स्पर्धेत घुग्घूसचे विद्यार्थी चमकले

दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथील एस. एफ. एस. कॉलेजच्या प्रांगणात कराटे कोकूसाई फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सेंसेई रविकांत मेश्राम, सेंसेई श्रीकांत मेश्राम, सेंसेई अमित शेंडे व सेंसेई पवन येवले यांच्या मार्गदर्शनत “इन्स्पिरेशन कप नॅशनल कराटे स्पर्धा” संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण सहा राज्यांतील 317 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत घुग्घूस येथील फिट्टुफाइटस कराटे अँड मार्शल आर्ट्स स्कूल तथा वॉरियर्स कराटे अकॅडमी येथील 17 खेळाडूंनी तब्बल 35 पदकांची लूट करत घुग्घूसचा झेंडा अभिमानाने फडकावला.

स्पर्धेतील प्रमुख विजेते पुढीलप्रमाणे —
• कु. आर्थिका संजय उपाध्ये – ब्लॅक बेल्ट काता चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक, चॅम्पियन ट्रॉफी व रोख पारितोषिक.
• आर्येश संजय उपाध्ये – 1 सुवर्ण, 1 रौप्य
• विर विनय बोढे – 1 सुवर्ण, 1 रौप्य
• ध्रुव गोपी टिगूटला – 1 सुवर्ण, 1 रौप्य
• उत्कर्षा गणेश राखूंडे – 2 कांस्य
• श्रेयसी विनय बोढे – 1 रौप्य, 1 कांस्य
• आराध्या रवींद्र बोमनल्ली – 2 कांस्य
• स्वरा सचिन पाऊलबुधे – 1 सुवर्ण, 1 कांस्य
• कोविद दीपक तुरानकर – 1 सुवर्ण, 1 रौप्य
• शौर्य विवेक बोढे – 2 सुवर्ण
• वैष्णवी मनोज झोडे – 1 कांस्य
• आदेश पिंटू कांबळे – 1 सुवर्ण, 1 कांस्य
• ओजस प्रशांत चरडे – 1 रौप्य
• लक्ष्यद्वीप गणेश डोर्लीकर – 1 रौप्य
• महामना बत्तूला – 2 कांस्य
• नंदकिशोर नरेंद्र कोंगरे – 1 सुवर्ण, 1 रौप्य
• सक्षम सावन तेलंग – 2 सुवर्ण
• आयुष्मान श्रावण वर्मा – 2 सुवर्ण
• तेजस हर्ष कांबळे – 1 सुवर्ण, 1 रौप्य
• अभिरी विवेक शेंडे – 2 सुवर्ण
• भाव्या संतोश ढोबे – 1 सुवर्ण, 1 रौप्य

एकूण कामगिरी :
17 सुवर्ण, 8 रौप्य आणि 10 कांस्य, अशा 35 पदकांच्या जोरावर संघाने “हायेस्ट मेडल अवॉर्ड” आणि “बेस्ट टीम अवॉर्ड” पटकावला.

या विजयी पथकाला शिहान विनय बोढे, सेंसेई जयंती मद्देला आणि सेंसेई मोनिश हिकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेत टिम मॅनेजर सेंसेई इमरान खान व टिम कोच सेंसेई रोशनी तुकाराम गोमासे यांनी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले.

घुग्घूस येथील फिट्टुफाइटस कराटे अँड मार्शल आर्ट्स स्कूल तर्फे खेळाडूंचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री. विवेक बबनराव बोढे तसेच सर्व पालकगण यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले.

या अप्रतिम यशामुळे घुग्घूस येथील कराटे क्रीडेला नवचैतन्य लाभले असून, स्थानिक नागरिकांनी “कराटेचा सुवर्णयुग पुन्हा उजाडले” अशी भावना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!