Home चंद्रपूर चंद्रपूर – राजुरा महाराष्ट्रातून चौथा आरोपी अटक : नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा...

चंद्रपूर – राजुरा महाराष्ट्रातून चौथा आरोपी अटक : नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त ⚫सायबर सेल व सिटी कोतवाली राजनांदगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

0
148

चंद्रपूर – राजुरा महाराष्ट्रातून चौथा आरोपी अटक : नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त

⚫सायबर सेल व सिटी कोतवाली राजनांदगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

 

📰 Impact 24 News

राजुरा | अमोल राऊत l संपादकिय अहवाल

राजुरा : राजनांदगाव (छ.ग.) पोलिसांनी नशेच्या गोळ्यांच्या अवैध विक्रीविरुद्ध मोठी कारवाई करत चंद्रपूर (महाराष्ट्र) राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथून चौथ्या आरोपीला अटक केली आहे. एन.डी.पी.एस. कायदा कलम 21(बी) अंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणात आरोपीकडून नशेच्या “नायट्रो-10” गोळ्यांची खरेदी-विक्री संबंधित कागदपत्रे, मोबाईल व स्कॅनर जप्त करण्यात आले असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

अटकेतील आरोपी साजिद कादर शेख (वय 30, रा. लकडकोट, मदिना मेडिकल, पो. विरूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र, कायम पत्ता देवडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) असा आहे. या आरोपीकडे नशेच्या गोळ्यांच्या व्यापाराशी संबंधित बिल, स्कॅनर आणि मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली होती. १) किशोर सिन्हा (वय 48, पेण्ड्री, ता. लालबाग, राजनांदगाव),

२) किशन सेन (वय 40, जमातपारा, मिश्रा गली, राजनांदगाव),

३) विशाल मिश्रा (वय 30, बल्देवबाग, वॉर्ड क्र. 15, राजनांदगाव)

या तिघांकडून 190 नग नायट्रो-10 गोळ्या (किंमत ₹1,482), तीन टचस्क्रीन मोबाईल (₹30,000) आणि ट्रक क्र. CG 08 AS 8158 (₹12 लाख किंमतीचा) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चौकशीत या आरोपींनी नशेच्या गोळ्या लक्कडकोट (चंद्रपूर) येथील मदिना मेडिकल दुकानातून विकत घेतल्याचे कबूल केले.

यानंतर सायबर सेल आणि सिटी कोतवाली राजनांदगाव यांच्या संयुक्त टीमने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात येऊन आरोपी साजिद कादर शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नशेच्या गोळ्यांच्या विक्रीचा गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून गोळ्यांच्या खरेदी-विक्रीचे बिल, स्कॅनर आणि मोबाईल जप्त करण्यात आले.

त्याला दि. 25 ऑक्टोबर रोजी अटक करून राजनांदगावला आणले आणि दि. 26 ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर करून न्यायिक कोठडीत पाठविण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहित गर्ग (भा.पो.से.), अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल देव शर्मा व नगर पोलिस अधीक्षक वैशाली जैन (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच थाना प्रभारी निरीक्षक नंदकिशोर गौतम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या मोहिमेत उपनिरीक्षक राधेश्याम जुर्री, आरक्षक राजा बारले, सायबर सेलचे उपनिरीक्षक नरेश कुमार बंजारे, आरक्षक अविनाश झा व मनोज खुंटे तसेच संपूर्ण पोलिस पथकाची मोलाची भूमिका राहिली. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नशेच्या गोळ्या, गांजा व अवैध दारू विक्रीविरुद्ध मोहिम सातत्याने राबविण्यात येणार असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

“राजुरा तालुक्यात औषधांचे बेकायदेशीर एवढं मोठे रॉकेट सुरू असून याचा अन्न व औषध प्रशासन राजुरा, चंद्रपूर यांना थांगपत्ता नसल्याचे मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे. शिवाय शेजारील तेलंगणा राज्यातील औषधे आणून देवाडा व लक्कडकोट येथील मेडिकल मध्ये रुग्णांना सर्रासपणे डॉक्टरांच्या परवानगी शिवाय दिली जात आहेत. स्थानिक सबंधित प्रशासनाची असलेली मेहरबानी संशयास्पद भूमिका निर्माण करणारी ठरत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!