यशोदाताई व्यंकटेश आत्राम ‘मधुकरराव मडावी साहित्यभूषण’ पुरस्काराने सन्मानित…
वर्धा / अर्पित वाहाणे
३ मे २०२६ रोजी नवोदित आदिवासी साहित्य परिषद आयोजित कार्यक्रम सेंट्रल सेलेब्रेशन हॉल, यवतमाळ येथे उत्साहात पार पडला. आर्वी शहरातील आदिवासी व आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या समाजसेविका व लेखिका यशोदाताई व्यंकटेश आत्राम यांना मधुकरराव मडावी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवोदित आदिवासी साहित्य परिषद व जिज्ञासा बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी उर्जा मिळून समाजसेवेच्या प्रवासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यवतमाळ येथे आयोजित साहित्य संमेलनात आदिवासी साहित्यकांनी बोलीभाषेच्या संशोधनाकडे लक्ष दिले पाहिजे आणि प्रचलित प्रमाण भाषेच्या सोबतच आपल्या बोलीभाषेतून लिखाण केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय लोहकरे यांनी केले. येथील सेलिब्रेशन हॉलमध्ये आदिवासी साहित्य परिषदेत संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. तुकाराम रोंगटे होते. प्रमुख अतिथी यशोदा आत्राम, बाबाराव मडावी, प्रा.डॉ. माधव सरकुंडे, प्रा. शीतल ढगे, बाळकृष्ण गेडाम, राजू मडावी, पैकूजी आत्राम, शंकर मडावी, डॉ. अरविंद कुळमेथे, प्रा. वसंत कन्नाके, रामचंद्र आत्राम, प्रभात कनाके होते.
संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. वसंत कनाके यांनी केले. व्यंकटेश आत्राम साहित्यरत्न पुरस्कार प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांना आणि यशोदा व्यंकटेश आत्राम यांना मधुकरराव मडावी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले. बाबाराव मडावी, प्रा. डॉ. माधव सरकुंडे, प्रा. डॉ. संजय लोहकरे यांना साहित्यरत्न पुरस्कारांनी सन्मानित केले. बीज भाषण प्रा. शीतल ढगे यांनी केले, संचालन प्रा.रामचंद्र आत्राम, प्रा. संगीता मसराम, डॉ. विलास कनाके, विद्या परचाके, प्रा. मोहिनी कुडमेथे, जयश्री मडावी यांनी केले.
यशोदाताई व्यंकटेश आत्राम यांचे आदिवासी साहित्य कार्य व समाजकार्य लक्षात घेता त्यांना मधुकरराव मडावी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.









