Home चंद्रपूर घुग्घूस शहराच्या स्वच्छतेला लॉयड्स इन्फिनिटीचा मदतीचा हात 

घुग्घूस शहराच्या स्वच्छतेला लॉयड्स इन्फिनिटीचा मदतीचा हात 

0
35

घुग्घूस शहराच्या स्वच्छतेला लॉयड्स इन्फिनिटीचा मदतीचा हात 

 

नगरपरिषदेच्या मागणी वरून दिल्या दोन चारचाकी कचरागाडी भेट 

 

घुग्घूस :- शहरातील कचरा संकलना करीता कचरागाडी अपुऱ्या पडत असल्यामुळे नगरपरिषदेच्या सत्तापक्षाच्या वतीने लॉयड्स मेटल्स कंपनीला चार कचरागाडी सि. एस. आर. निधीतून देण्याची मागणी करण्यात आली होती.

 

त्या अनुषंगाने आज दिनांक 07 मे 2026 रोजी लॉयड्स इन्फिनिटीच्या माध्यमातून घुग्घूस नगरपरिषदेला दोन बॅटरीवर चालणाऱ्या चार चाकी कचरागाडी देण्यात आले.

यांचे लोकार्पण नगरपरिषदेचे नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे कंपनीचे अधिकारी तरुण केसवानी तसेच विद्या पाल यांच्या हस्ते करण्यात आले. उर्वरित दोन कचरागाडी पंधरा दिवसा नंतर देण्यात येणार आहे.

 

या लोकार्पण प्रसंगी नगरसेविका सौ. आशा पानघाटे, नगरसेविका सौ. पल्लवी घुले, नगरसेविका सौ. सुनीता पेंदोर,नगरसेवक दिलीप पिट्टलवार, स्विकृत नगरसेवक तौफिक शेख, प्रशांत सारोकर, गणेश पानघाटे, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, दिपक पेंदोर, अजहर शेख, नगरपरिषदेचे हरी जोगी व अन्य मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!