Home वर्धा महाप्रज्ञा बहूद्देशीय मंडळ व सिद्धार्थ बुद्ध विहार समिती, अकोला बाजार यांच्या संयुक्त...

महाप्रज्ञा बहूद्देशीय मंडळ व सिद्धार्थ बुद्ध विहार समिती, अकोला बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने १३५ व्या भीमजयंती निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0
113

महाप्रज्ञा बहूद्देशीय मंडळ व सिद्धार्थ बुद्ध विहार समिती, अकोला बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने १३५ व्या भीमजयंती निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

वर्धा / अर्पित वाहाणे
अकोला बाजार येथे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती तसेच प्रियदर्शी, धम्मनायक, चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती चे औचित्य साधून विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. “बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम” हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला. समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा उद्देशाने आयोजकांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रम सोमवारी ४ मे रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता. अकोला बाजार येथील संविधान चौकातील या कार्यक्रमात निशाताई थोरात, विनोद ढाकणे, आशीष खरतडे, अक्षयभाऊ व संच यवतमाळ यांचे सादरीकरण झाले. आयोजकाकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावाचे सरपंच योगेश राजूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक तथा गटनेता, न.पं.यवतमाळ नगरसेवक तथा गटनेता डॉ. नीरज वाघमारे, वडगाव जंगल पोलीस स्टेशन ठाणेदार श्री. दांडे, उपसरपंच प्रवीण मोगरे, सतीश पाटील व अनेक पाहुणे उपस्थित होते. नागरिकांचा देखील या कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. अश्याच प्रकारचे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम नेहमी घेत राहू असे SBV BOYS नवयुवक मंडळ अकोला बाजार यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!