बुद्धाचा संदेश आजच्या काळाची गरज पद्माकर कांबळे यांचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराज टी पॉइंट सावंगी मेघे वर्धा येथे प्रबोधन मेळावा
वर्धा/अर्पित वाहाणे
वर्धा छत्रपती शिवाजी महाराज मित्र परिवाराच्या वतीने सावंगी मेघे टी पॉइंट वर्धा येथे मित्र परिवाराच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त खीर दान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्यआयोजन प्रेमदास मोखाडे व वर्षाताई मोखाडे यांनी केले होते. यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हा अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली . यावेळी मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांचा प्रबोधन आणि बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम सकाळी 10 घेण्यात आला. सर्वात प्रथम पद्माकर कांबळे यांनी बुद्ध जयंती निमित्त विचार प्रकट करताना म्हणाले की, गौतम बुद्धाचे धम्म तत्त्वज्ञान विश्वप्रेम निर्माण करणारे आहे आणि म्हणून देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, असे मौलिक विचार सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पदमाकर कांबळे यांनी येथील व्यक्त केले. बुद्धांनी स्वातंत्र्य, समता, बंधता मूल्याने मानवी जीवनाला सौंदर्य रूप प्रदान केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मूल्यांना भारतीय संविधानात प्रतिष्ठित करून बुद्धाच्या विचारांना संविधानिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. बुद्ध, फुले, आंबेडकर म्हणजे परिवर्तनाच्या चळवळीतील समतावादी, विज्ञाननिष्ठ विचारधारा होय. असे विचार पद्माकर कांबळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी पद्माकर कांबळे यांनी बुद्ध जयंती निमित्त गीत सादर करताना म्हणाले गीताचे बोल सारे भारत की शान और दुनिया मे नाम बुद्ध भीम जैसा ग्यानी दिखा दीजिए, एक शांती कहे एक क्रांति कहै, गुरु चेले हो ऐसे दिखा दिजिये.असे बुद्ध जयंतीच्या च्या निमित्याने गीत सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यानंतर गायक कमलाकर वाघमारे, गायक संजय मोडक यांनी बुद्ध जयंती निमित्त एक से बढकर एक गीत सादर केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गणेश भाऊ इखार, रमेश भाऊ साठवणे, आनंद सोनटक्के, प्रेम सिंग राठोड, अमोल रामटेके, गजानन पेटकर, राजू दोड, सुनील बाबळे, मनोज मेश्राम, विकास वासनिक, पंकज पेटकर, रंगराव पाटील, गजानन चौधरी, बालू कावडे, विकेश वानखेडे, आनंद भाऊ फुलमाळी, सुरेश थोरात, सुनील शास्त्रकार, प्रभाकर चोंदे, प्रफुल देशमुख, सिद्धार्थ डोळस, अजय जवादे इत्यादी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




