Home चंद्रपूर वर्धा नदीत बुडून बाप-लेकीसह भाचीचा मृत्यू, आमदार किशोर जोरगेवार यांची सांत्वनपर भेट

वर्धा नदीत बुडून बाप-लेकीसह भाचीचा मृत्यू, आमदार किशोर जोरगेवार यांची सांत्वनपर भेट

0
92

वर्धा नदीत बुडून बाप-लेकीसह भाचीचा मृत्यू, आमदार किशोर जोरगेवार यांची सांत्वनपर भेट

धानोरा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत वर्धा नदीकाठी आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकीसह भाचीचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
राजू कोडापे (वय ४०), अर्तिता कोडापे आणि प्रियंका मडावी अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबीय वर्धा नदीकाठी आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतकांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी त्यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली असून, शासनाकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी सरपंच विजय आगरे, उपसरपंच विनोद खेवले, राकेश पिंपळकर, करण नायर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!