Home चंद्रपूर अनधिकृत बांधकाम प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ग्रामपंचायत विरूर स्टेशन ला कारणे दाखवा...

अनधिकृत बांधकाम प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ग्रामपंचायत विरूर स्टेशन ला कारणे दाखवा नोटीस…

0
76

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ग्रामपंचायत विरूर स्टेशन ला कारणे दाखवा नोटीस…

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदामाचे कुलूप तोडून तेथील शासकीय बांधकाम साहित्याचा विनापरवाना वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही नोटीसमध्ये नमूद करण्यात आला आहे.

 

या संदर्भात यापूर्वीही संबंधितांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यावर समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून शासकीय मालमत्तेचे नुकसान, अनधिकृत वापर तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

 

नोटीसमध्ये संबंधितांना सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कोणतीही पुढील सूचना न देता अनधिकृत बांधकाम हटविणे, शासकीय साहित्याची वसुली करणे तसेच फौजदारी कारवाईसह कठोर प्रशासकीय पावले उचलण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

या प्रकरणाच्या पुढील कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!