मिशन 200 चा दमदार आरंभ, संकल्प फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम
प्रा. पंकज नरुले हें आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी देवदूतांचे खरे अवतार
चामोर्शी, सुखसागर झाडे :– स्थानिक शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पंकज नरुले यांनी संकल्प फाउंडेशन ची स्थापना करीत शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बद्दल करण्याचा वसा चालवीला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गावाखेडयातील उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची गोडी निर्माण करून विविध मार्गदर्शनीय कॅम्पस चे आयोजन करीत विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी देत आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी देवदूताची भूमिका निभावणारें खरे देवदूताची भूमिका निरपेक्ष निभावीत आहेत.
नवगुरुकुल विद्यापीठ (हिमाचल आणि पुणे कॅम्पस) साठी झालेल्या पात्रता परीक्षा आणि 3 टप्प्यांच्या मुलाखतींमध्ये संकल्प फाऊंडेशन च्या तब्बल 9 मुलींची निवड झाली आहे.
या सर्व मुली पहिल्या पिढीत शिकणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मजूर, कष्टकरी पालकांच्या लेकी आहेत. ज्या मुलींना कधी कॉम्प्युटरची भीती वाटायची, त्या आज स्वतः फॉर्म भरत आहेत, ऑनलाईन परीक्षा देत आहेत आणि आत्मविश्वासाने मुलाखती पार करत आहेत.
संकल्प फाऊंडेशनच्या मार्गदर्शनामुळे आणि समाज कल्याण विभागाच्या विश्वासाने हा बदल शक्य होत आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे असे मत संकल्प फाउंडेशन चे संचालक दिव्य दुर दृष्टीकोणवादी तडफदार मार्गदर्शक सर्वेसर्वा विद्यार्थीप्रिय प्रा. पंकज नरुले यांनी व्यक्त केला आहे.









