Home चंद्रपूर जुन्या आठवणींना उजाळा देत 85 वा वाढदिवस साजरा

जुन्या आठवणींना उजाळा देत 85 वा वाढदिवस साजरा

0
104

जुन्या आठवणींना उजाळा देत 85 वा वाढदिवस साजरा

जुन्या आठवणींना उजाळा देत सेवानिवृत प्राचार्य अरुणराव पा. झोटिंग यांचा 85 वा वाढदिवस हा एक अत्यंत दुर्मिळ आणि भावनिक सोहळा जो कुटुंबातील जुन्या आठवणींना उजाळा देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी त्यांचे जुने मित्र सहकारी,कुटूंबातील सर्व सदस्य, नातलग, खडकी गावातील नागरिक व वॉर्डातील मित्रगण यांना बोलावून परिवारातील सर्व सदस्यांनी केक कापून आणि स्नेहीजनांच्या उपस्थितीत स्नेहभोजन आयोजित करून तो अविस्मरणीय वाढदिवस साजरा केला.

वडिलांचा 85 व्या वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी त्यांचा मधला मुलगा राजेंद्र झोटिंग यांनी दोन दिवसात पूर्ण योजना आखली आणि पत्रिकेद्वारे निमंत्रण न देता सगळ्यांना भ्रमंध्वनी वरून या वाढदिवसाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले त्याप्रमाणे या सेलिब्रेशनसाठी सगळेजण उपस्थित राहिले.

सेवानिवृत्त प्राचार्य अरुणराव पा. झोटिंग यांचा 85 वा वाढदिवस आदरपूर्वक आणि स्मरणीय पद्धतीने साजरा करण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा, सन्मान सोहळा, आणि स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे सहकारी मित्र सेवानिवृत प्रा.येनूरकर सर तसेच प्रा.ज्ञानेश्वर खडसे, प्रा.अभिजित डाखोरे व कुटूंबीयांनी शाल, श्रीफळ व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला.

त्यांच्या शिकवण्याच्या शैलीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल सेवानिवृत प्रा. येनूरकर सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की तुमचे मार्गदर्शन आमच्या जीवनात सदैव प्रकाश देत राहो.””ज्ञान आणि कर्माचे उपासक असलेल्या सेवानिवृत प्राचार्य झोटिंग साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!तर प्रा. ज्ञानेश्वर खडसे यांनी मनोगत व्यक्त करताना आपले आयुष्य आनंदी व निरोगी असो.””सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे आनंदाचे, आरोग्याचे आणि नव्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे जावो,आणि शंभर वर्ष पूर्ण करून जन्मशताब्दी वर्षाला आम्हाला पुन्हा शुभेच्छा देण्याचे बळ मिळो तसेच
तुमचं मार्गदर्शन आमच्या जीवनात सदैव प्रकाश देत राहो आपल्या मेहनतीचे फळ आणि शिष्यांचे प्रेम नेहमी मिळत राहो असे मनोगत व्यक्त करताना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा. अभिजत डाखोरे यांनी केले. याप्रसंगी सेवानिवृत प्राचार्य अरुणराव झोटिंग यांचे सहकारी मित्र, खडकी येथील नागरिक, नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!