मेत्ताशा इण्डेन गॅस एजन्सी कडून गॅसधारकांची लूट
सुरक्षा हौसची बळजबरी, गॅस करिता ग्राहकांच्या रांगा
होम डिलिव्हरी बंद केल्याने अपघाताची शक्यता
आवाळपूर :- औद्योगिक नगरी गडचांदूर मध्ये इण्डेन गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे अशातच येथील अधिकृत मेत्ताशा इण्डेन गॅस एजन्सीकडून गॅसधारक ग्राहकांची अडवणूक करत बळजबरीने सुरक्षा हौस (पाईप) ची विक्री केली जात आहे. घरगुती सिलेंडर करिता 960/- रुपये घेतले जात असून गॅस सिलेंडरची उचल करण्याकरिता 11 किलोमीटर दूर असलेल्या कवठाळा येथील गॅस गोडाऊनपर्यंत पायपीट करावी लागत आहे. हे सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नसून यात अपघाताची शक्यता आहे गोडावून वरून सिलेंडर घेतल्यास जवळपास 36 रुपये रिबेट दिली जाते सुट का देत नाही व घरपोच सिलेंडर का दिले जात नाही याबाबत विचारणा केली असता परप्रांतीय कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जाते एजन्सी कडून ग्राहकांची लूट होत असल्याने जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांचे एक हप्त्यापूर्वी सिलेंडर डिलिव्हरीचे मेसेज असताना सुद्धा या ग्राहकांना सिलेंडर देण्यात आलेले नसून सिलेंडरची काळाबाजार करण्यात येत असल्याची माहिती आहे. या एजन्सीमध्ये परप्रांतीय कर्मचारी असून ते गॅस ग्राहकांसोबत मुजोरी करतात तुमको लेना है तो लो नही तो निकलो असे गैरवर्तन करीत असल्याची माहिती आहे सिलेंडरच्या वाहतूक करिता काही राजस्थान पासिंगच्या टाटा एस गाड्या आहे ज्याचा इन्शुरन्स इत्यादी केलेला नाही मागील दोन वर्षापासून या राजस्थान पासिंग च्या गाड्या बिंदासपणे गॅस सिलेंडरची वाहतूक करीत आहे याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे राजस्थान पासून च्या या गाड्यांमधून नांदाफाटा वनसडी कोरपना उपरवाही या गावांमध्ये जाऊन सिलेंडरची अवैद्य विक्री करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एकंदरीत या गॅस एजन्सी विरोधात मोठ्या प्रमाणात गॅस ग्राहका मध्ये रोष आहेत गॅसधारकांना गॅस एजन्सी विरोधात तक्रार कुठे नोंदवायची याबाबत माहिती नाहीत इंडियन गॅस विक्री अधिकारी कोण आहेत त्यांचे मोबाईल नंबर ग्राहकांना माहीत नसल्याने एजन्सीवर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे नागरिकांनी 1800-2333-555 या टोल फ्री क्रमांकावर अन्यथा विक्री अधिकारी आकाश आमले मोबाईल क्रमांक 9422804656 यांच्याशी संपर्क करण्याची आव्हान करण्यात येत आहे.
मी मोबाईल वरून १९ तारखेला बुकिंग केली मी के. वाय. सि. करण्या करिता गेले असता त्यांनी मला पास बुक घेऊन येण्यास सांगितले मी पास बुक घेऊन गेलो असता त्यांनी बिल काढून १० किमी तळोधी गावाजवळ असलेल्या गोडाऊनला पाठविले. अनिल मोहितकर सांगोडा
कोरपना तालुक्यातील सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीचा बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकी मध्ये योग्य त्या सूचना देवू काळा बाजारी करीत असल्यास तशी नागरिकांनी तक्रार द्यावी. विक्की देवघरे अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी कोरपना








