Home चंद्रपूर नव्या पिढीचे विवाहाबाबतचे विचार ; राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा उत्साहात

नव्या पिढीचे विवाहाबाबतचे विचार ; राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा उत्साहात

0
56

नव्या पिढीचे विवाहाबाबतचे विचार ; राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा उत्साहात

चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथे स्वयंसिद्धा सेल, इंटरनल कम्प्लेंट कमिटी (ICC) आणि हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन स्तरावरील वादविवाद स्पर्धा उत्साहात पार पडली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली “Modern Relationships: Why New Generation is Afraid of Marriages?” या समकालीन विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बदलत्या नातेसंबंधांवर, विवाहाविषयी तरुण पिढीमध्ये निर्माण होत असलेल्या संकोचावर तसेच सामाजिक व मानसिक पैलूंवर परखड मते मांडली. काही विद्यार्थ्यांनी विषयाच्या बाजूने तर काहींनी विरोधात ठोस व अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी मांडणीमुळे स्पर्धेला बौद्धिक आणि विचारप्रवर्तक स्वरूप प्राप्त झाले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. आनंद डोनाल्ड (CSE विभाग) आणि प्रा. मैत्रेयी वेलंकीवार (ह्युमॅनिटीज विभाग) यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांची विचारांची मांडणी, तर्कशुद्धता आणि प्रभावी वक्तृत्व यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसिद्धा सेलच्या प्रमुख प्रा. अनुराधा दखणे, ICC प्रमुख डॉ. अल्का सावलीकर व डॉ. वनिता टोंगे, तसेच हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरच्या प्रमुख डॉ. देवश्री कोठगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या उपक्रमाच्या आयोजन समितीत प्रा. श्रीदेवी आक्केवार व प्रा. दीपाली वैद्य (इलेक्ट्रिकल विभाग) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी पेटकर (विद्यार्थिनी, इलेक्ट्रिकल विभाग) यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!