क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांसह इतर पुतळ्यांचे अनावरण व समाज प्रबोधन कार्यक्रम
चामोर्शी, सुखसागर झाडे :– तालुक्यातील हळदवाही येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा मंडळ, हळदवाही यांच्या वतीने कुपार लिंगो, सल्ला गांगरा, शहीद वीर बाबुराव शेडमाके व क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आदिवासी समाजाला जनजागृती करण्यासाठी आपल्या जीवाचे रानं करणारे विविध क्रांतिकारीनी आपले योगदान दिले. यामध्ये कुपार लिंगो हे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक आहे, तर सल्ला गांगरा हे आदिवासी समाजाचे गौरवशाली इतिहास दर्शवते.
शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला, तर क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमीन अबाधित राखण्यासाठी जीवाचं बलिदान देत आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी काम केले.
आजच्या समाजातील युवकांनी अशा क्रांतिकारी विरांचे विचार आत्मसात करून समाज प्रबोधनासाठी काम करावे .
आदिवासी संस्कृतीचे रक्षण करणे आणि समाजातील गरीब व वंचित वर्गाचे उत्थान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. असे मत मान्यवरांनी आपले व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना प्रबोधन केले.
या उदघाटनीय सोहळ्याला माजी आमदार डॉ. नामदेवर उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष मनोहरजी पोरटी, तसेच अनेक मान्यवर व आदिवासी बंधू भगिनीं बहुसंखेने उपस्थित होते.









