Home चंद्रपूर शेगडी वर केटलीत चहा शिजवून गॅस दरवाढीचा निषेध

शेगडी वर केटलीत चहा शिजवून गॅस दरवाढीचा निषेध

0
114

शेगडी वर केटलीत चहा शिजवून गॅस दरवाढीचा निषेध

छत्रपती शिवाजी चौकात काँग्रेसचे निषेध आंदोलन

 

घुग्घूस : देशातील मोदी शासनाने घरगुती गॅस मध्ये 60 रुपयांची तसेच व्यवसायिक गॅस मध्ये 150 रुपयांची वाढ केली असून सध्या देशात गॅस तूटवडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. अनेक हॉटेल बंद पडले असून अनेक नागरिकांना गॅस अभावी उपाशी रहायची वेळ आलेली आहे.
मोदी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच फसलेल्या विदेश नितीमुळे व एपस्टीन फाईल्स व अदानी प्रकरणामुळे स्वतःची तसेच आपल्या मित्राचे प्रकरण दाबण्यासाठी अमेरिकेला शरण गेल्यामुळेच देशातील जनतेला घरगुती व व्यवसायिक गॅस दरवाढीची झळ सोसावी लागत आहे याविरोधात आज दुपारी 12 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल नरुले व घुग्घूस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दरवाढी निषेधार्थ लक्षणिक आंदोलन करण्यात आले.
मुख्य चौकात गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली व शेगडी पेटवून त्यात केटली मध्ये चहा बनवून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मोदी शासना विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या सदर आंदोलनात नगरपरिषदेचे बांधकाम सभापती रोशन पचारे, सार्वजनिक स्वच्छता वैद्यक व आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी,नगरसेवक सूरज कन्नूर,नगरसेविका पल्लवी घुले, नगरसेविका आशा पाणघाटे, महिला व बालकल्याण उप – सभापती श्रुतिका कलवल, नगरसेविका सुनीता मंदेश्वर पेंदोर,नगरसेवक तौफिक शेख,नगरसेवक दिलीप पिट्टलवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा महासचिव अलिम शेख,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, संध्या मंडल, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, आयेशा शेख,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, गजानन मासिरकर,लड्डू चिलका,किशोर आवळे,बालकिशन कुळसंगे, कल्याण सोदारी, अनिरुद्ध आवळे, दिपक पेंदोर, अजहर शेख,रोहित डाकूर,निखिल पुनघंटी, सुनील पाटील, निखिल ठमके, कपील गोगला, गणेश पाणघाटे,दिनेश घुले,दिपक पेंदोर,संजय कोवे,अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!