Home गडचिरोली एकदाचा जीव घ्या पण आमच्या काळजाचा तुकडा घेऊ नका ; शेतकऱ्यांची शासनाला...

एकदाचा जीव घ्या पण आमच्या काळजाचा तुकडा घेऊ नका ; शेतकऱ्यांची शासनाला आर्त हाक

0
91

एकदाचा जीव घ्या पण आमच्या काळजाचा तुकडा घेऊ नका ; शेतकऱ्यांची शासनाला आर्त हाक

शेतकऱ्यांच्या मदतीला देवदूत म्हणून संत मुर्लीधर महाराज व कांग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद भगत गेले धावून, शेतकरी लढ्यात देणार जाहीर पाठिंबा

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :- तालुक्यातील मौजा मुधोली चक न २ येथील शेतकऱ्यानी आमचा जीव गेला तरी चालेल पण आमची जमीन द्यायची नाही असा पावित्रा घेतला आहे. जिथं जमीन द्यायची नाय तर आम्ही चर्चा कसली आणि कुणाशी करणार..? आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही जमीन देणार नाही, ज्यांना कुणाला चर्चा करायाची आहे त्यानी गावात येवून चर्चा करावी. असा पवित्रा घेतला आहे.
११ मार्चपासून चालू असलेल्या या शेतकरी लढ्याला श्री संत मुरलीधर स्वामी महाराज यानी मार्गदर्शन करीत शेतकरी लढ्यात पाठिंबा दर्शवीला व मार्गदर्शनात बोलले कीं,मुख्यमंत्री पालकमंत्री आहेत. त्यानी गावात येवून गावकरी यांच्याशी चर्चा करून भुसंपादन रदद करावे. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र लढा उभारण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रमोद भगत यानी
शेतकऱ्याची लढाई लढणाऱ्यानी पक्षभेद दूर सारून एकत्र येवून जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या पोटाची भाकर (शेती) वाचवण्यासाठी शेतकऱ्यासोबत ठामपने उभा असायला हवे होते असा विरोधकांना टोला मारला.
तसेच बोलताना ते म्हणाले कीं, भेंडाळा भागातील शेतकरी जमीन द्यायला तयार नाही. मग आमदार साहेब मुंबई ला कशाला घेवून जाता. गडचिरोली जिल्ह्याचे विद्यमान मुख्यमंत्री हेच पालकमंत्री आहेत मग त्यांनी जिल्हाधिकारी याना सांगुन ११ फरवरी च्या नोटीफिकेशन ला तात्काळ रद्द करावे. प्रमोद भगत अध्यक्ष तालुका कॉग्रेस कमेटी चामोर्शी यांनी व्यक्त होताना म्हटले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कॉग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल तसेच विधानसभा व लोकसभा व न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचे उपस्थिती शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले. यावेळी गणपुर रै येथील सरंपच सुधाकर गद्दे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश परसोडे यानी सुद्धा मार्गर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!