Home चंद्रपूर आयएसओ मानांकित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घुग्गुस येथे पंचायत समिती...

आयएसओ मानांकित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घुग्गुस येथे पंचायत समिती चंद्रपूर पथकाची भेट

0
100

आयएसओ मानांकित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घुग्गुस येथे पंचायत समिती चंद्रपूर पथकाची भेट

 

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित आयएसओ मानांकित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घुग्गुस येथे आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोज शनिवारला ला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या उपक्रमांतर्गत अंतर्गत पंचायत समिती चंद्रपूर येथील पथकाने भेट दिली. सदर भेटीमध्ये चंद्रपूर तालुक्यातील सन्माननीय गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिग साहेब केंद्रप्रमुख मा.अनिल दागमवार सर , केंद्रप्रमुख मा.कोरडे सर ,केंद्रप्रमुख मा. ज्ञानदेवी वानखेडे मॅडम, तसेच केंद्रप्रमुख किशोर बेसेकर सर सदर मान्यवर उपस्थित होते .या भेटी अंतर्गत सदर पथकाने शाळेचे सुशोभीकरण, परिसर निरीक्षण, वर्ग खोल्या, भौतिक सुविधा, आणि शालेय अभिलेख यांची पाहणी केली . तसेच वर्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले .या उपक्रमांतर्गत सदर पथकाने शाळेचे अंतर्गत व बाह्य मूल्यांकन केले. शाळेतील मुख्याध्यापिका अनु चोथे मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांना माननीय गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिग साहेब यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या उपक्रमांतर्गत अंतर्गत मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!