Home गडचिरोली युवा स्फूर्ती वार्षिक स्नेहमीलन निमित्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन

युवा स्फूर्ती वार्षिक स्नेहमीलन निमित्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन

0
86

युवा स्फूर्ती वार्षिक स्नेहमीलन निमित्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन

चामोर्शी:- सुखसागर झाडे

आष्टी:- श्री ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे युवा स्फूर्ती वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 2026 निमित्य क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम.माटे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रभारी शारीरिक शिक्षण संचालक डॉ.प्रदीप कश्यप, डॉ. दिपक नागापुरे, प्रा. राहुल आवारी आदी उपस्थित होते.
सांघिक खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास असे अनेक गुणांचा विकास होऊन तान तणाव कमी होतो आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र माटे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!