Home चंद्रपूर दिल्ली-पंजाबच्या धर्तीवर “चंद्रपूरच्या विकासासाठी आम आदमी पक्षाच्या चार विकास गॅरंटी” – ऐतिहासिक...

दिल्ली-पंजाबच्या धर्तीवर “चंद्रपूरच्या विकासासाठी आम आदमी पक्षाच्या चार विकास गॅरंटी” – ऐतिहासिक घोषणा

0
109

दिल्ली-पंजाबच्या धर्तीवर “चंद्रपूरच्या विकासासाठी आम आदमी पक्षाच्या चार विकास गॅरंटी” – ऐतिहासिक घोषणा

चंद्रपूर, १० डिसें. : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पक्षातर्फे पत्रकार परिषद आयोजित करून “चंद्रपूरच्या विकासासाठी चार ठोस गॅरंटी” जाहीर करण्यात आल्या.

📌 सध्याची परिस्थिती

चंद्रपूर शहरातील जनतेने मागील अनेक वर्षांत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे सत्ताकाळ पाहिले आहेत. दुर्दैवाने, या दोन्ही पक्षांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. आज चंद्रपूर महानगरपालिका भ्रष्टाचाराचे केंद्र बनली असून, सत्ताधारी भाजपा आणि विरोधक काँग्रेस हे एका नाण्याच्या दोन बाजू ठरल्या आहेत.

💰 ४५० कोटी रुपयांचा बजेट – पण विकास कुठे?

आज शहराचा महानगरपालिकेचा वार्षिक बजेट सुमारे ४५० कोटी रुपये असतानाही:

– शासकीय शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे
– खासगी शाळांचे जाळे वाढत आहे
– नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे
– रस्ते व नाल्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत
– पाणी पुरवठा अनियमित असून अन्यायकारक बिल आकारणी सुरू आहे

🎯 आम आदमी पक्षाच्या चार विकास गॅरंटी

🔶 १) शिक्षण क्रांती

✅ प्रत्येक झोनमध्ये जागतिक दर्जाच्या एका नवीन शाळेची उभारणी
✅ शिक्षण पूर्णतः मोफत आणि जागतिक दर्जाचे
✅ AI तंत्रज्ञानयुक्त अत्याधुनिक शाळांची निर्मिती
✅ विद्यार्थ्यांसाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा
✅ शिक्षकांना परदेशी प्रशिक्षण दौरे देण्यात येतील, जेणेकरून शिक्षणाची गुणवत्ता वाढेल

🔶 २) आरोग्य संजीवनी

✅ प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज एका नवीन रुग्णालयाची निर्मिती
✅ महानगरपालिकेच्या वतीने मोफत तपासणी, उपचार आणि औषधे
✅ गरज भासल्यास खाजगी रुग्णालयातही महानगरपालिकेच्या खर्चाने उपचार
✅ आम आदमी पक्षाची सत्ता आली, तर मनपा क्षेत्रातील कोणत्याही नागरिकाला उपचारासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही

🔶 ३) जलसमृद्धी

✅ पाणी पूर्णतः मोफत देण्यात येईल
✅ जुन्या थकीत पाणीबिलांची संपूर्ण माफी
✅ प्रत्येक घरात स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा


🔶 ४) विकास क्रांती

✅ रस्ते व नाल्यांना २० वर्षांची लेखी हमी
✅ एकदा रस्ता पूर्ण झाला, तर पुढील २० वर्षे खोदकाम होणार नाही
✅ खड्डेमुक्त, टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची हमी
✅ निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई व काळ्या यादीत समावेश

🟦 नागरिकांना आवाहन

चंद्रपूरकर नागरिकांनो,

भाजपा आणि काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता उपभोगली, मात्र शहराचा खऱ्या अर्थाने विकास करण्यात ते अपयशी ठरले.

आता भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जनहिताचे सरकार आणण्यासाठी आम आदमी पक्षाला एक संधी द्या.

तसेच समाजकार्याची इच्छा असलेल्या सर्व इच्छुक नागरिकांनी आम आदमी पक्षाकडे उमेदवारीसाठी संपर्क साधावा, असे आप तर्फे आवाहन करण्यात आले.

 

👥 उपस्थित पदाधिकारी

या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रभारी सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखले, संघटन मंत्री संतोष बोपचे, महिला अध्यक्षा अॅड. तब्बसूम शेख, वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, शहर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, संतोष दोरखंडे, सौ. पुष्पकला बोपचे, श्याम पुंडे, उमेश रहांगडाले, अनिल मेश्राम, जिल्हा सचिव राज नगराळे, भास्करजी सपाट ,पवनकुमार प्रसाद शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे,गणेश रासपायले,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!