घुग्घुस शहरात निवडणुक येणे न माजी नेते, सदस्य जागे होणे!
रोखठोक l पंकज रामटेके
घुग्घुस शहरात प्रथमच नगरपरिषद निवडणूक लागणार. पहिले घुग्घुस शहरात ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत निवडणूक लागताच सर्व आजी, माजी, सामाजिक नेत्यानी एकत्र ग्रामपंचायत कार्यालयात येवुन एक सभा घेतली आणि कुणीच ग्रामपंचायत निवडणूकीत फार्म भरायचा नाही. तर घुग्घुस नगरपरिषद झाली पाहिजे यासाठी एक सभा घेण्यात आली होती. आणि सर्व पक्ष मिळुन एक संघ तयार केला आणि आंदोलने केले. मग काही दिवसा नंतर नगरपरिषद घोषित करण्यात आली. तेव्हा पासून सर्व पक्षातील नेते कुंभकर्णी झोपी गेले होते. नगरपरिषद होताच कोरोना लागला व निवडणूक लांबणीवर गेली. आता अंदाजे पाच वर्षा नंतर नगरपरिषद निवडणूक होणार आहे आणि आता माजी. ग्रा.पं.सदस्य, सदस्या जागे झाले आहेत. आता घरोघरी, वार्डा-वार्डात फिरू लागले आहेत.
नाहीतर आपल्याच वार्डात मदतनीस कधीच धावुन नाही गेले, आतातर त्यांना वार्डात कोणते कामे आहेत हे पाहून सोशल मिडियावर जागृत होत आहेत. तरी आता घुग्घुस शहरातील नागरिकांकडून वारंवार बोलण्यात येत आहे आता पुराणे आजी, माजी ग्रा.पं. सदस्य पावसाळ्यात जसे बेडूक कसे बाहेर येउन ओरडाव तसे फक्त निवडणूकीपुरते चित्र दिसत आहे.
घुग्घुस शहरात निवडणूक लागणे म्हणजे आजी, माजी बेडूक डराव – डराव ओरडणे असेच आहे. असे नागरिकांकडून चाय टपरीवर, विविध ठिकाणावर बोलण्यात येत असते. तसेच राजकीय पक्षाकडून सामान्य जनतेला नगरपरिषद टिकीट देणार का..? पावसाळ्यात बेडूक जसे ओरडतात तसे सध्या निवडणुकी पुरते नेते पद व भावी सदस्य म्हणून स्वतःला मिरवत गाजावाजा करणाऱ्यांना तिकीट देनार असे घुग्घुस शहरातील वार्डा-वार्डातील नागरिकांकडून बोलण्यात येत आहे. काँग्रेस, भाजप पक्षाकडे लक्ष वेधून घेत पुन्हा निवडणूक मैदानात येणार का असे सद्या चित्र विचित्र दिसून येत आहे.









