एएसडीसी चांदा येथे संस्मरणीय दिवस!
आज अदाणी फाउंडेशन व अदाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर (ASDC) चे कार्यकारी संचालक श्री. वसंत गढवी सर यांच्या उपस्थितीत ए.एस.डी.सी. चांदा केंद्रात एक प्रेरणादायी दिवस साजरा करण्यात आला.
या भेटीदरम्यान वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केंद्र परिसरात हरित वातावरणाची निर्मिती करण्यात आली. गधवी सरांनी वर्गखोल्या, संगणक प्रयोगशाळा, इलेक्ट्रीशियन लॅब आणि जी.डी.ए. लॅब यांना भेट देऊन केंद्राची पायाभूत सुविधा पाहिली तसेच प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी आमच्याकडे अन्य मान्यवर अतिथींचीही उपस्थिती लाभली:
श्री. सत्यनारायण दिगामर्थी – प्लांट हेड, अदाणी सिमेंट, चांदा,
श्री. साई गौतम – सी.एस.आर. हेड, अदाणी फाउंडेशन, चांदा,
श्री. राजकुमार मोरे – क्लस्टर हेड, ए.एस.डी.सी. तिरोडा,
श्री. राजीव दुबे – सिव्हिल हेड, अदाणी सिमेंट, चांदा,सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले व संपूर्ण दिवस उत्साह, आनंद आणि प्रेरणाने भरलेला ठरला.








