मौजा टेंभुरवाही येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना हायवा पकडला
राजुरा (ता. प्र.) :मौजा टेंभुरवाही येथे आज सकाळी अवैध गौण खनिज (रेती) वाहतूक करत असलेला MH34 BG 8419 क्रमांकाचा हायवा पकडण्यात आला आहे. ही कारवाई सकाळी सुमारे 6 वाजता करण्यात आली असून, संबंधित वाहनास सकाळी 6.30 वाजता तहसील कार्यालय राजुरा येथे लावण्यात आले.
सदर हायवा सचिन युकीनकर, गडचांदुर यांच्या नावावर असून, वाहन चालवणारा जनार्दन राठोड असा चालकाचा नाव आहे. या हायव्यात अंदाजे 6 ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक केली जात होती.
कारवाईदरम्यान तलाठी रामचंद्र बोधे, शिल्पा बल्लेवार आणि घनश्याम शेटे यांनी संयुक्तपणे उपस्थित राहून ही कारवाई केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे.








