Home गडचिरोली सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीस सुरुवात…

सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीस सुरुवात…

0
102

सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीस सुरुवात…

महसूल विभागाने ई-पिक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना केले आवाहन

 

गडचिरोली, सुखसागर झाडे

“माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा” या युक्ती प्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल विभागा अंतर्गत मागील चार वर्षांपासून शेतातील पिकांची नोंद घेण्यासाठी ई पीक पाहणी अँप्स सुरु करण्यात आली आहे.

वर्षातील तिन्ही हंगामात ई पीक पाहणी मोबाईलवर करणे शासनाने बंधनकारक केले आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत ई पिक पाहणी केली आहे.

त्याअनुषंगाने खरीप हंगाम 2025-26 साठी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी ची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 होती. आता 1 ऑक्टोम्बर 2025 पासून सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीस सुरुवात झालेली असून अंतिम तारीख 30 ओक्टोम्बर 2025 आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्याचीं ई पीक पाहणी झालेली नाही. अशा शेतकरऱ्यांनी सहाय्यक कडून आपल्या शेतातील पिकांची नोंद करून घ्यावी. अन्यथा शासकीय लाभापासून वंचित राहावे लागेल.

असे आवाहन महसूल विभागाने काही कारणास्तव ई पिक पाहणी नोंद न करणाऱ्या शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!