“घुग्घुस होरपळला” : उष्णतेच्या लाटेने जनजीवन ठप्प
नगरसेवक जोमात नागरिकांना बनवले एप्रिल फुल!
लक्षवेधी l पंकज रामटेके चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहर है एक प्रदुषण व सर्वाधिक प्रचंड उष्णतेने गाजलेल्या मुख्य शहर आहे,शहराच्या परिसरात अनेकानेक कंपनी आहे,एप्रिल महिन्यापासून उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवला होता. आता मे महिन्याची सुरवात झाली असून तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
बिनस्ताधारी नगरसेवक जोमात तर सत्ताधारी कोमात असे काही नगरसेवक जोमात अन्य नगरसेवक कोमात असे नागरिकांत चांगलीच चर्चा गाजत आहे,सत्ताधारी चार महिने झाले तरी कामे होत नाही असे चित्र बनवत आहे बिनसत्ताधारी पण नागरिकांत चांगलीच चाय टपरीवर चर्चा होत आहे की,बिनस्ताधारी नगरसेवक जोमात पर्यावरण मंत्री जिल्ह्यातील अनेक कंपनीत आणले तसेच नागरिकांना बोलुन खुपच गर्दी केली, प्रदुषणमेक्त करणार असे आवाहन केले पण एप्रिल फुल नागरिकाला केले,बिनसत्ताधारी सेवकाचे तर केंद्रात, राज्यात तसेच जिल्ह्यातही सत्ता आहे तरी एप्रिल फुल करत गेले. एप्रिल असे करीत आहे की,टोकण, कुपन देवुन नागरिक कशी जमा करायची महिल्यांची गर्दी करून वरिष्ठ नेत्यांना,मंत्रीना स्टंट बाजी दाखवणे तेवढेच नाहीतर निवडणूकीत निवडणून येण्यासाठी बरेच नाबालिग मुलांचा साह्यायाने आर्थीक वाटून जसे की,फक्त नगरसेवकासाठी येवढा आर्थीक वाटली की,मंत्रीची निवडणूक होय नागरिक घुग्घुस शहरातील केव्हा जागृत होणार फक्त यांच्यावर लक्ष वेधले आहे एप्रिल फुल कोण बनवत आहे सत्ता पश्चिम बंगाल मधे बसली पण शहरात बिनस्ताधारी नगरसेवक जोमात लाडू वाटणार असेही चर्चा करण्यात येत आहे.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असह्य होते. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, नेहमीची गजबज कमी झाल्याचे चित्र आहे. वाहतुकीची वर्दळही घटली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला असून, दिवसभर दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सायंकाळी वातावरणात थोडा गारवा जाणवल्यानंतर मात्र नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस बाजारपेठेत अचानक गर्दी वाढत असल्याचे दिसून येते. महिला, पुरुष, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दिसतात. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी दुपट्टा, टोपी, गॉगल्स यांचा वापर वाढवला आहे. तसेच थंड पाणी, शीतपेय व आईस्क्रीम यांची मागणी वाढली आहे. मात्र, या वाढत्या मागणीमुळे शीतपेयांच्या
गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने शीतपेयांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठल्याने मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिक उष्णतेपासून हैराण तर अनेक नगरसेवकांनी बनवले एप्रिल फुल,काळजीघेवून घुग्घुस शहरातील सर्व नगरसेवक एकत्रित येऊन प्रदुषण नियंत्रणमुक्त तसेच तर उष्णतेपासून बचाव कार्य करा अशी नागरिकांत चर्चा व लक्ष वेधून निर्णय घेण्यात यावे.अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



