राजुरा बोगस मतदार नोंदणीत भाजप कनेक्शन उघड…
राजुरा विधानसभा मतदार यादीतील ६८५३ बोगस मतदार नोंदणी प्रकरणात (FIR दि. 19.10.2024) ठोस पुरावे असूनही पोलिस प्रशासन निष्क्रिय आहे. या FIR मध्ये स्पष्ट नावे व मोबाईल क्रमांक नमूद आहेत, तरीही १२ महिने उलटून गेले तरी जबाब नोंद, अटक किंवा कसलीही चौकशी झालेली नाही.
विशेष म्हणजे, १५ व्या क्रमांकावरचा मोबाईल नंबर 7820864519 हा अनिल झाडे यांचा आहे, जे भाजप गडचांदूर नेते निलेश ताजणे यांच्या मेडिकलशी संबंधित आहेत. तसेच १६ व्या क्रमांकावरचा मोबाईल नंबर 9607217143 हा प्रतीक सदानपवार यांचा आहे, जे गडचांदूरचे भाजप कार्यकर्ते आहेत व ज्यांचे सुधीर मुनगंटीवार व देवराव भोंगले यांच्यासोबतचे फोटो उपलब्ध आहेत. हे दोन्ही नंबर FIR मध्ये स्पष्ट नमूद असूनही, अजूनपर्यंत त्यांना अटक करून चौकशी का झालेली नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तसेच गंगाधर, बंडू व क्रीश लिहिलेले नाव व नंबर हे बाखर्डी परिसरातील असून ते देखील बीजेपी संबंधित आहेत.
ही घटना ही लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचा कट असून मतदार याद्यांमध्ये खोट्या नोंदी घालून निवडणुकीवर परिणाम करण्याचा थेट प्रयत्न आहे. मात्र पोलिस प्रशासनाने निष्क्रियता दाखवत जबाबदारी निवडणूक आयोगाकडे ढकलली आहे. हे जनतेच्या विश्वासाशी केलेले थेट धोकेबाज कृत्य आहे.
माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्राद्वारे ठाम मागणी केली आहे की, या आरोपींना तातडीने अटक करून चौकशी करण्यात यावी, मास्टरमाईंड समोर आणावा आणि कारवाईचा अहवाल सार्वजनिक करावा. यासंदर्भात ज्येष्ठ नेते अॅड. मुरलीधर देवाळकर, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड. दीपक चटप, स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पोर्णिमा निरंजने आदींनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.







