Home गडचिरोली अवैध दारूसह 73 लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

अवैध दारूसह 73 लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

0
181

अवैध दारूसह 73 लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

 

गडचिरोली, सुखसागर झाडे : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काही व्यक्ती छुप्या पद्धतीने अवैध दारूची वाहतूक आणि विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 01 ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 730 पेट्या देशी दारूसह एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून एकूण 73 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहेरी तालुक्यातील मौजा मद्दीगुडम येथे धाड टाकण्यात आली. या वेळी महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी (क्र. MH 34 CD 8410) वाहनात अवैध देशी दारू भरून विक्रीसाठी नेण्याची तयारी सुरु असल्याचे आढळले. या कारवाईत पोलिसांनी आरोपी मिथुन विश्वास मडावी, वय 35 वर्षे, रा. आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली यास दारूसह वाहनासहित ताब्यात घेतले. तथापि, इतर तीन सहकारी मात्र पोलिसांचे अस्तित्व कळताच घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

या कारवाईत देशी दारूचे 730 बॉक्स, किंमत अंदाजे 58,40,000 रुपयेमहिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी वाहन, किंमत अंदाजे 15,00,000 रुपये एकूण मुद्देमाल 73,40,000 रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहेरी पोलीस ठाण्यात अप. क्र. 306/2025, कलम 65 (अ), 65 (ई), 83, 98(2), महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य आरोपी मिथुन विश्वास मडावीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पुढील तपास सपोनि. देवेंद्र पटले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!