Home चंद्रपूर मृधनी फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मृधनी फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0
117

मृधनी फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

चिमूर, ३० सप्टें. :- तालुक्यातील मृधनी फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड मासळ बुज. ची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा काल २९ तारखेला उत्साहात पार पडली. या वेळी कंपनीचे सर्व संचालक सी. ई. ओ. लेखापाल भागधारक व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच आर्थिक अहवाल सादर करण्यात आला. यावेळी शेतकरी उत्पादकांना दिलेल्या सेवांचा उल्लेख करत पुढील वर्षाच्या विविध उपक्रमाची आखणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे. प्रकिया उद्योग उभारणे. आणि नवीन प्रकल्प हाती घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मृधनी फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे सी. ई. ओ. प्रफुल मेश्राम सर यांनी सर्व शेतकऱ्यांच्या सामने ऑडिट रिपोर्ट वाचुन दाखवली तसेच कंपनी मधे भविष्यात 1000 भागधारक शेतकरी कसे जोडता येईल या बाबत मार्गदर्शन केले. तसेच विकासगंगा सामाजिक संस्था घाटंजी चे कर्मचारी भानसे सर यांच्या उपस्थिती मध्ये शेतकऱ्यांना शेअर सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. कंपनीच्या संचालक निशा पाटील यांनी कंपनीला पुढे कसे नेता येईल या बद्दल सर्व भागधारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर बैठकीचे सूत्रसंचालन कंपनीचे संचालक नितेश गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन कंपनी चे संचालक हेमचंद बोरकर यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ संदेश खापर्डे सर, विनोद शंभरकर सर आणि विकासगंगेचे सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!