Home चंद्रपूर त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला

0
141

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी 24 तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांना स्वामी समर्थ केंद्र जवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी दगड आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यात किरण ताजने हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अपोलो रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही निंदनीय घटना असून लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभावर हा घाला आहे. या गुंड प्रवृत्तींना वेळीच ठेचून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया च्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!