ईद ए मिलादूनबी निमित भोजनादन
के.जी.एन. हार्डवेयर खडसंगी चा उपक्रम
तालुका प्रतिनिधी / चिमूर
तालुक्यातील खडसंगी येथे मोठ्या उत्साहात ईद मिलादुंबी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.या वेळी खडसंगी येथे के.जी.एन.हार्डवेयर यांचे वतीने भोजन दान करून ईद साजरी करण्यात आली.
मुस्लिम बांधवांच्या महत्वपूर्ण सनांपैकी एक महत्वाचा समजल्या जाणारा सण ईद ए मिलादूनबी शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा उत्सव पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जीवनमान,शिक्षा व मानवता विषयक विचारासाठी साजरा केला जातो.या दिवसाला एक त्यांचे स्मरण करून साजरा केला जातो.
खडसांगी येथे मुस्लिम बंधावाकडून ईद ए मिलादूनबी साजरी करण्यात आली.या वेळी के.जी.एन. हार्डवेअर चे संचालक इरफान पठाण,इम्रान पठाण, सिखंदर पठाण यांचे कडून नागरिकांना भोजन दान करण्यात आले. या वेळी अनस पठाण, साहील कुरेशी, माजी उपसरपंच दत्तू देव्हारे,नंदू नागोसे,संदीप दडमल,अमोल नागोसे,आदित्य वाकुलकर, मुक्का पातर यांनी सहकार्य केले.








