Home चंद्रपूर भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ईद-ए-मिलादनिमित्त लाडू वाटप

भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ईद-ए-मिलादनिमित्त लाडू वाटप

0
228

भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ईद-ए-मिलादनिमित्त लाडू वाटप

घुग्घुस: येथील भाजपातर्फे ५ सप्टेंबर रोजी सकाळी गांधी चौकात ईद-ए-मिलाद उन-नबीनिमित्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले.

शहरात ईद-ए-मिलाद उन-नबी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांतर्फे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुस्लिम समाज बांधवांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. तसेच मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा सचिव विनोद चौधरी, भाजयुमोचे गणेश कुटेमाटे, निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, सतीश बोन्डे, बंटी आगदारी, गणेश राजूरकर, अजय लेंडे, सुनील ब्रम्हे व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!