घुग्घुस शहरात मोकाट जनावराचा वावर व मोठे वाहतूकीचे पावर… प्रशासनाचे व वरिष्ठ नेत्याचे दुर्लक्ष!
पंकज रामटेके
दिवसेंदिवस घुग्घुस शहरात घुग्घुस येथील वणी रोड व चंद्रपूर रस्त्यावरील मार्ग जात असल्याने दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील मोठी वाहतूक उभे असते तसेच मोकाट जनावरे बरेच ठिकाणी बसलेले असतात. वाहतूक पोलीसचे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव नागरिकांकडून बोलण्यात येत असते.तसेच घुग्घुस नगर परिषद प्रशासनाचे मोकाट जनावराचा दुर्लक्ष करण्यात येत आहे.
यावेळी लहान वाहन धारकांना व पायदळ नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागते, मोठे वाहतूक ट्रकाच्या मोठ्या प्रमाणात पावर वाढलेले भाव मिळत आहे. येत्या जाता छोठे वाहनाला व नागरिकांना रस्त्यांच्या खाली उतरवावे लागते.
मोकाट जनावरे रस्त्यावर किंवा मध्दशी डिवायडरवर बसलेले राहते आणि नगरपरिषद दुर्लक्ष करीत राहतात.
तसेच अनेक नेते चाय,टपरीवर फक्त राजकारण करीत नगरपरिषद सेवक बनाची चर्चा चुटकुले, थातूरमातूर आंदोलन,पोस्टर्स बाजी,स्पर्धा आयोजन अशा विविध विषयांवर चाय,टपरीवर चर्चा करीत बसतात. तसेच सामाजिक महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणी नेते कामे करीत असतात.
शहरात नगरपरिषद निवडणूक लवकरच लागणार आहे,फक्त त्यांच्यासाठीच गावचे थातूरमातूर नेते,सामाजिक कार्यकर्ते सध्या जागे झाले. पोस्टर्स बाजी,संस्ट,सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले.असेही नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.
नागरिकांकडून बोलण्यात येत आता मोठे वाहतूक रस्त्याच्या बाजुला करणार का वाहतूक पोलीस तसेच मोकाट जनावराचा सुळसुळाट मार्ग होणार का नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत राहणार का योग्य मार्ग निघणार का प्रशासन,विविध वरिष्ठ पक्षाचे नेते लक्ष वेधून कामे होणार का,नाहीतर चाय टपरीवरच चर्चा होत राहणार का असा नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.








