शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक कार्डधारक धान्यापासून वंचित…
विरूर स्टेशन (प्रतिनिधी) अविनाश रामटेके
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दर महा मिळणाऱ्या धान्याच्या वाटपात शासनाच्या गोंधळलेल्या धोरणामुळे अनेक लाभार्थ्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
यंदा शासनाने तीन महिन्यांचे – म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 – या कालावधीचे अंत्यदोय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्त्याना धान्य एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हे धोरण लाभदायक ठरणार असे वाटत असतानाच प्रत्यक्षात अंमलबजावणीत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
गोडाऊनमध्ये पुरेशा प्रमाणात माल उपलब्ध नसल्यामुळे काही दुकानांमध्ये वेळेवर धान्य पोहोचलेच नाही. आणी सततच्या सर्व्हर डाऊन मुळे वाटपात विलंब तसेच, अनेक कार्डधारक विविध कारणांमुळे – जसे की पावसामुळे ये-जा करणे अशक्य होणे, आजारपण, कामानिमित्त अनुपस्थिती – यामुळे जून-जुलै महिन्यांमध्ये रेशन घेऊ शकले नाहीत.
आधी सुरुवातीच्या टप्प्यात मशीनवर जून ,जुलै व आगस्ट या तीनही महिन्यांचे धान्य उपलब्ध असल्याचे दाखवले जात होते. मात्र आता, ऑगस्ट महिन्याच्या वाटपावेळी मशीनवर केवळ ऑगस्ट महिन्याचेच धान्य दाखवले जात असून, मागील दोन महिन्यांचे धान्य अदृश्य झाले आहे. त्यामुळे जे कार्डधारक वेळेवर रेशन घेऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आता धान्य मिळवणे कठीण झाले आहे. कार्ड धारक हे रेशन दुकानदार कडे आता माझे उर्वरित रेशन गेले कुठे असा लावत तगादा आहे .
या गोंधळामुळे सामान्य गरजू नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून दुकांनदारत व कार्डधारक मध्ये वाद निर्माण होण्याचे चित्र दिसून येत आहे , शासनाने तात्काळ यावर उपाययोजना करावी आणि उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांना मागील महिन्यांचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.








